कोविड १९ चा हा उपचार नाही तर हे एक पोषक सप्लिमेंट आहे, ज्याला इम्युनो सप्लिमेंट असे म्हणतात
कोविड 19 रूग्णांवर गाईच्या चिकाचे सप्लिमेंट देऊन मी केलेले संशोधन, एका जागतिक दर्जाच्या जर्नलने प्रकाशित केले आहे. या संशोधनानुसार प्राण्यांचा चिक किंवा त्याचे सप्लिमेंट (माझ्या संशोधमध्ये मी इम्यूरिच नावाचे सप्लिमेंट रुग्णांना दिले होते) खाल्ल्याने कोविड 19 रुग्ण लवकर बरे झाले आहेत.

कोविड 19 रूग्णांवर गाईच्या चिकाचे सप्लिमेंट देऊन मी केलेले संशोधन, एका जागतिक दर्जाच्या जर्नलने प्रकाशित केले आहे. या संशोधनानुसार प्राण्यांचा चिक किंवा त्याचे सप्लिमेंट (माझ्या संशोधमध्ये मी इम्यूरिच नावाचे सप्लिमेंट रुग्णांना दिले होते) खाल्ल्याने कोविड 19 रुग्ण लवकर बरे झाले आहेत. जेव्हा आपल्याला कोणतेही वायरल इन्फेक्शन (विषाणू संसर्ग)होते तेव्हा आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी त्या वायरसला नष्ट करण्यासाठी अँटीबोडीज किंवा इम्युनोग्लोब्युलीन तयार करतात. तर हे अँटीबोडीज किंवा इम्म्युनोग्लोब्युलिन प्राण्यांच्या चीकामध्ये भरपूर प्रमाणात असते.त्यामुळे आपल्याला व्याधीप्रतिकारशक्ती (passive immunity)मिळते.
चिक शुद्ध स्वरूपात मिळत असेल तर तो नक्की खावा किंवा त्यापासून बनवलेले सप्लिमेंट खावे. फक्त ते "फ्रोझन ड्राईड किंवा फ्रीझ ड्रायिंग" ह्या पद्धतीनुसार बनवलेले असले पाहिजे.
विश्वराज हॉस्पिटल मध्ये मी केलेल्या ह्या संशोधनामध्ये ज्या स्टडी ग्रुपला हे गाईच्या चिकाचे सप्लिमेंट दिलेले होते त्यांच्यामध्ये लवकर बरे होण्याचे प्रमाण दिसून आले. त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस दुसरा ते तिसरा होता आणि जे कंट्रोल ग्रुपमध्ये होते, ज्यांना सप्लिमेंट दिले नव्हते,त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस सहावा ते आठवा होता.
ह्यामधील एक अतिशय महत्वाचा शोध म्हणजे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठीचा आहे, ज्यांनी सप्लिमेंट खाल्ले त्या रुग्णांना बाहेरून मास्कद्वारे दिला जाणारा ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात आणि कमी दिवस लागला,सध्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या बेड्सची कमतरता आहे, त्यासाठी हा शोध खूप उपयुक्त ठरेल, कोविडच्या रुग्णांनी चिक किंवा त्याचे सप्लिमेंट खाल्ल्यास लवकर बरे वाटून ऑक्सिजनचे बेड्स पण उपलब्ध होतील.
तसेच चिक हा पदार्थ आपण भारतीय खूप प्राचीन काळापासून खात आलो आहोत, त्यामुळे अपणा सर्वांना चिक माहिती आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे चिकाची कोणालाही अॅलर्जी
नसते, किंवा ह्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर दिसून येत नाहीत, पण ज्यांना दुधाची अॅलर्जी असते त्यांनी मात्र हा चिक खाऊ नये
गाईच्या चिकासोबतच म्हशीचा, शेळीचा चिक सुद्धा तेवढाच उपयुक्त आणि पोषक आहे जेवढा गाईचा चिक आहे, फक्त हे संशोधन गाईच्या चिकावर करण्यात आल्यामुळे इथे फक्त गाईचा चिकाचा उल्लेख करण्यात आला आहे.