top of page

डायबेटिसच्या रुग्णांनी पातेल्यामध्ये तुपासोबत शिजवलेला पांढरा भात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही, संशोधनाने सिद्ध.

डायबेटीसचे रुग्ण पांढरा भात खावु शकतात का?

डायबेटिसच्या रुग्णांनी पातेल्यामध्ये तुपासोबत शिजवलेला पांढरा भात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही, संशोधनाने सिद्ध.

जवळपास सर्वच डायबेटिस च्या रुग्णांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची भीती असते आणि काही प्रमाणात ते खरेही आहे, किंवा ब्राऊन राईस खाण्यास सांगितला जातो, परंतु ब्राऊन राईस पचायला खूप जड असतो, पोटात गॅसेस होण्याचा त्रास होवू शकतो, आणि चविला पण चांगला नसतो. शिवाय पांढरा भात आवडीने खाणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे.

परंतु जर भात कुकरमध्ये न शिजवता तो तुपामध्ये २ ते ३ मिनिट्स परतून पातेल्यामध्ये शिजवला तर असा भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखर अजिबात वाढत नाही. पुणे येथील विश्वराज हॉस्पीटल मध्ये मागील वर्षभर चाललेल्या ह्या संशोधनात डॉ स्वाती खारतोडे यांनी १०३ डायबेटिसच्या रुग्णांना ह्या पद्धतीने तयार केलेला भात खाण्यास सांगितले. संशोधनामध्ये ह्या रुग्णांना समावेश करून घेण्याआधी त्यांची एच बी ए वन सी हि रक्ताची तपासणी करण्यात आली. ही तपासणी तुम्हाला तुमच्या मागील तीन महिन्यांची साखरेची सरासरी पातळी किती आहे, हे सांगते. तीन ते चार महिने ह्या पद्धतीने भात खाल्ल्यानंतर पुन्हा एच बी ए वन सी हि रक्तातील तपासणी करण्यात आली, त्यामध्ये असे आढळून आले की ८६ % डायबेटिसच्या रुग्णांची एच बी ए वन सी हि रक्ताची तपासणी कमी झाली होती, म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले होते, ह्यातून हे सिद्ध होते की अशा पद्धतीने भात शिजवल्यास आणि तो भात डायबेटिसच्या रुग्णांनी खाल्यास त्यांची रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही तर ह्याउलट ती कमी होते, डॉ स्वाती खारतोडे यांनी सांगितले की, हे संशोधन असा दावा अजिबात करत नाही की अशा पद्धतीने शिजवलेला भात रक्तातील साखर कमी करते, तर हे सिद्ध करते की ह्या पद्धतीने शिजवलेला भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही. हे संशोधन "जर्नल ऑफ ड्रॅग डिलिव्हरी अँड थेरपेटीक्स" मध्ये प्रकाशित झाले आहे.

डॉ स्वाती खारतोडे, मुख्य आहारतज्ञ आणि संशोधक, विश्वराज हॉस्पिटल पुणे

© 2022 by Dr. Swati Khartode. Proudly created with Riyanshitsolution

bottom of page