top of page

दुधाची पावडर "लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी दुधाला उत्तम पर्याय

"दुधाची पावडर "लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी दुधाला उत्तम पर्याय
वाढीच्या वयातील मुलांना (0-18 वर्ष ) रोज सर्व पोषक घटकांनीयूक्त असा आहार घेणे गरजेचे असते आणि दूध हे पूर्वीपासूनच पूर्णाहार मानले जाते,कारण दुधामध्ये बहुतांश पोषकघटक असतात,पण सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे दूध मिळणे थोडे कठीण झाले आहे

दुधाची पावडर "लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी दुधाला उत्तम पर्याय

"दुधाची पावडर "लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी दुधाला उत्तम पर्याय

वाढीच्या वयातील मुलांना (0-18 वर्ष ) रोज सर्व पोषक घटकांनीयूक्त असा आहार घेणे गरजेचे असते आणि दूध हे पूर्वीपासूनच पूर्णाहार मानले जाते,कारण दुधामध्ये बहुतांश पोषकघटक असतात,पण सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे दूध मिळणे थोडे कठीण झाले आहे किंवा मिळत असेल तरी त्यातून विषाणूसंसर्ग होऊ नये म्हणून बहुतांश लोक दूध घेत नाहीत,त्यामुळे दुधाची पावडर हा त्यावरील उत्तम उपाय आहे. 2 मोठे चमचे (20 ग्रॅम ) पावडरमधून जवळपास पाव लिटर दूध तयार होते आणि ते हि फक्त 10 रु.एवढ्या खर्चामध्ये,जवळपास दुधाच्याच किमतीमध्ये. सध्या दुधाची विक्री होत नाही अशा परिस्थितीत बहुतांश दूध उत्पादकांनी दुधाची पावडर करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे दुधाची पावडर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. म्हणून किराणा सामान आणताना त्यासोबतच दुधाची पावडरही महिनाभरासाठी घेऊ शकता, कारण पावडर महिनाभर आरामात टिकते.

डॉ.स्वाती खारतोडे

वैद्यकीय आहारतज्ञ,पुणे.

© 2022 by Dr. Swati Khartode. Proudly created with Riyanshitsolution

bottom of page